दरम्यान मुंबईतील दुचाकीस्वारांच्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विक्रोळी पार्क साईट इथल्या सावरकर मार्गवर दोन तरुण दुचाकीवरुन भरधाव वेगात येत होते. त्यावेळी दोन्ही तरुण बाईकवर उभं राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र यावेळी एक तरुणाचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. सुदैवाने मागे गाडी नसल्याने त्याचा जीव वाचला.
मुंबईतील विक्रोळी पार्क साईट इथे सावरकर मार्गावर दुचाकीवर जीवघेणा स्टंट करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अरबाज मोहम्मद हारुन खान आणि अरमान कयूम शेख अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी हे दोघेही घाटकोपरमधील रहिवासी आहेत.
या तरुणांनी हा स्टंट तीन महिन्यांपूर्वी केला होता. मात्र तो स्टंट करत असताना अरबाज खान दुचाकीवरुन पडल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर आला आणि व्हायरल झाला. त्यानंतर पार्क साईट पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या दोघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या दुचाकीही जप्त केल्या आहेत.

