मध्य रेल्वेच्या महिला डब्यात एका गर्दुल्याने केला महिलेवर हल्ला

मध्य रेल्वेच्या महिला डब्यात एका गर्दुल्याने  केला महिलेवर हल्ला

मध्य रेल्वेच्या महिला डब्यात एका गर्दुल्याने महिलेवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

डोंबिवली रेल्वे स्थानकातून सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी लोकल सुरू झाल्यानंतर एका गर्दुल्याने डब्यात प्रवेश केला. त्यावेळी एका महिलेने लेडीज डब्यात का चढला असा जाब विचारला असता या गर्दुल्याने त्या महिलेला मारहाण केली.

यावेळी लोकलमध्ये एकच गोंधळ उडाला. परंतू डब्यातील सर्व महिलांनी मिळून त्या गर्दुल्याला पकडून कुर्ला रेल्वे स्थानकावर उतरवून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन आहे.

यापूर्वी बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणा-या उपनगरीय लोकलमध्ये ग्रँट रोड ते चर्नी रोड रेल्वे स्थानकादम्यान पाच ऑगस्ट रोजी एका २२ वर्षाच्या तरुणीवर सुशांत ऊर्फ पप्पू यादव या तरुणाने बलात्काराचा प्रयत्न केला होता. त्याला १० ऑगस्ट रोजी नागपाडा परिसरातून रेल्वे पोलिसांनी अटक केली.

लोकल सुरू असताना अचानक एक तरुण महिलांच्या डब्यात चढला व त्याने या तरुणीशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. या झटापटीत या तरुणीचे कपडेही फाटले होते. या तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याने ती तरुणी प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने त्याचा प्रतिकार करून आरडाओरडा केला. याच दरम्यान तिथे असलेल्या काही महिला तिच्या मदतीसाठी धावून आल्याने हा भामटा लोकल स्लो होताच चर्नी रोड रेल्वे स्थानकापूर्वीच उडी मारून पळून गेला होता.

दरम्यान, महिला प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून लोकलमधील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पून्हा एकदा उपस्थित झाला आहे. त्यामुळे सध्या रिकामी लोकल गुन्हेगारांचे लक्ष्य ठरत असल्याने कमी गर्दी असलेल्या लोकलच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात यावे अशी मागणी महिला प्रवाशांमधून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *