देशातील सर्वच राज्य आणि सर्व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये आजपासून कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम सुरु झाली आहे. राज्यात पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये ड्रायरन होत आहे. प्रत्यक्ष लस दिली जाणार नसली तरी लसीकरणावेळी करावी लागणारी सर्व सिद्धता, तयारी याची प्रॅक्टीस करण्यात आली.
जालन्यात कोरोना लसीचे ड्रायरन सुरू झाले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून रंगीत तालमीला सुरूवात झाली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वतः ड्रायरनला उपस्थित होते. जालना जिल्ह्यात 3 ठिकाणी ड्रायरन होणार आहे. सकाळपासूनच शिस्तबद्धरित्या ड्रायरनला सुरूवात झाली आहे. या ठिकाणी एका महिला कर्मचाऱ्याने लस टोचून घेतली आहे

