पेण घटनेतील पिडीत मुलीच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले त्यांच्या घरी आले. मात्र हौशी कार्यकर्त्यांना याचे भान राहिले नसल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांनी पीडितांच्या नातेवाईकांना स्वतःच्या घरातून बाहेर आणले. तसेच त्यांनी खाली बसवून मंत्री महोदयांना खुर्चीत बसवले. त्यामुळे मंत्री महोदय नक्की सांत्वन करण्यासाठी आले होते कि, सदिच्छा भेट देण्यासाठी, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला. हा कार्यकर्त्यांचा उद्दामपणा स्थानिकांना न पटण्यासारखा होता. परिणामी, काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
पिडीत जमिनीवर अन् मंत्री खुर्चीवर

