संपूर्ण देशात कोरोना लस मोफत देणार

संपूर्ण देशात कोरोना लस मोफत देणार

केंद्रातील मोदी सरकारने आज कोरोनाव्हायरस लस (Vaccine) मोफत देण्याची मोठी घोषणा केली. केंद्र सरकारच्यावतीने असे सांगण्यात आले की, कोरोना व्हायरस लस संपूर्ण देशात विनामूल्य देण्यात दिली जाईल.

देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु झालं आहे. यातच एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांनी त्यांना दिल्लीप्रमाणं देशातील सर्व राज्यात कोरोना लस मोफत देणार का? असा सवाल केला असता डॉ हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना लस दिल्लीतच नाही तर सर्व देशात मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी कुठलंही शुल्क घेतलं जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *