रेल्वे उद्घोषकाचा आत्महत्येचा प्रयत्न

उल्हासनगर येथील व्यंकटेश वेयुगंटी हा मध्य रेल्वेत उद्धोषक म्हणून काम करत आहे. मात्र करोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्याला वेतन मिळाले नाही. घरची आर्थिक परिस्थिती खालावल्याने, महिन्याचा खर्च आणि कुटुंबाच्या गरजा भागवायच्या कशा, असा प्रश्न होता. नैराश्यातून बुधवारी रात्री व्यंकटेशने आपल्या राहत्या घरी फिनाइल प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तसेच आत्महत्या करतानाचा व्हिडीओ आपल्या मोबाइलवर काढत तो सोशल मिडियावर पोस्ट केला. या घटनेनंतर त्याला तात्काळ उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर पुढील उपचार सुरू असून प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेले अनेक महिने वेतन मिळत नसल्याने रेल्वेमंत्री, कामगार मंत्रालय, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे पत्राद्वारे तसेच ट्विटरच्या माध्यमातून वेतनाची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याचे उद्घोषक असलेल्या व्यंकटेशच्या एका मित्राने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *