बायकोला खूश करण्यासाठी काय पण…

पत्नीला खूश करण्यासाठी कोणी काय करेल हे सांगता येत नाही. असाच एक प्रकार समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या चोरट्याची सध्या पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.पत्नीला मित्राचं साड्यांचं दुकान असल्याचं सांगून त्यानं 30 पेक्षा जास्त साड्या, ड्रेस गिफ्ट केले. एक रोहन सोनटक्के हा सराईत चोरटा वारजे परिसरात चोरीचा मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सापळा रचून त्याला अटक केल्यानंतर 9 चोऱ्यांचा उलगडा झाला. त्याच्याकडून दोन मोटारी, एक दुचाकी, १८ मोबाईल, ३ लॅपटॉप, ३० साड्या, १२ ड्रेस असा १३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नवीन लग्न झाल्यामुळे पत्नीला खुश करण्यासाठी एकाने चक्क साड्या आणि ड्रेस चोरले. रोहन सोनटक्के हा सराईत चोरटा पोलिसांची हाती लागला. त्यानंतर ही माहिती समोर आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *