नवीन वर्षाचा 2021 आज पहिला दिवस. नव्या वर्षाचं स्वागत जल्लोषात झाल्यानंतर, सर्वजण सूर्योदयाची वाट पाहत असतात. नव्या वर्षाचा हा पहिला सूर्योदय सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येवो. ही सदिच्छा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या दर्शन व्हावे यासाठी सिद्धीविनायक परिसरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केलीय. ज्यांनी ऑनलाईन बुकींग केलंय त्यांनाच आतमध्ये जाऊन दर्शनाची परवानगी आहे.
तर नववर्षाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देखील भक्तांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सकाळ पासून अनेक भक्त अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत..नववर्षाचा शुभारंभ आई आंबाबाई देवीच्या दर्शनाने करता यावा यासाठी भक्त अंबाबाई मंदिरात दाखल झाले आहेत…विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसू दे, सर्वाना हे नववर्षं सुख समृद्धीचं जावो असं साकडं अंबाबाईला भक्तांनी घातले.

