मुलगा होत नाही म्हणून जन्मदात्या आईकडून मुलीची पाण्यात बुडवून हत्या

वसई गावातील पाचूबंदर परिसरात ही घटना घडलीय. मुलगा होत नव्हता याची सल या आईच्या मनात नेहमी होती. त्यात जुळ्या मुली झाल्याने ती अधिकच नाराज झाली होती.  मुलाच्या हव्यासापोटी तिने मुलीची हत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्यानंतर जुळ्या मुलींपैकी एकीचं आयुष्य सुरु होण्याआधीच तिने संपवलं. घराच्या पाण्याच्या टाकीत बुडवून तिनं पोटच्या मुलीची हत्या केली.

याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. क्रूरकर्मा आईला वसई पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. असं करण्यामागे तिला कोणाचा दबाव होता का ? या घटनेत तिला कोणी मदत केली का ? याची माहिती मिळवली जातेय.

वसईत धक्कादायक अशी बातमी घडली आहे. जन्मदाती आईच आपल्या मुलीच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहायला मिळालंय. दीड महिन्याच्या मुलीची आईकडूनच हत्या करण्यात आलीय. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडालीय. असं कृत्य करण्यामागचं कारण देखील संताप आणणारं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *