‘या’ मोबाईलमधील WhatsApp होणार बंद!

आपल्याकडे जर Samsung Galaxy S2 किंवा iPhone 4 हे मोबाईल फोन असतील तर या फोनमधील WhatsApp वापरण्यास अडचण येऊ शकते किंवा ही सुविधा  बंद होऊ शकते.

एका अहवालात असं सागंण्यात आलंय की Android 4.0.3 आणि त्याच्या आधीच्या व्हर्जनच्या स्मार्टफोनचा WhatsApp चा सपोर्ट काढून घेण्यात आला आहे. जर आपल्याकडे या व्हर्जनचा स्मार्टफोन असेल आणि आपल्याला त्यात WhatsApp वापरायचं असेल तर तो स्मार्टफोन अपग्रेड करावा लागेल.

Google Nexus S, HTC Deisre S आणि Sony Ericsson Xperia Arc हे स्मार्टफोन्स एकेकाळी लोकप्रिय होते. त्यामध्ये अपडेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या फोन्समधील WhatsApp  बंद होण्याची शक्यता आहे.
नव्या वर्षात WhatsApp अनेक नवे फिचर्स उपलब्ध करुन देणार आहे, तसेच मल्टी डिव्हाइसची सोय उपलब्ध करुन देणार आहे.

त्याचसोबत आपण जर अॅपलचा iOS 9 वापरत असाल किंवा त्यापेक्षा कमी व्हर्जनचा आयफोन वापरत असाल तर त्यालाही अपडेट करावं लागेल. जर आपला आयफोन अपडेट होत नसेल तर WhatsApp वापरता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *