रायगड जिल्ह्यातील पनवलेमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊन असतानासुद्धा नागरिक खुलेआम बाहेर वावरत असतानाचा चित्र दिसून येत आहे. बाजारात खरेदीसाठी सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करण्यात येत नव्हते. वारंवार सूचना करुनही गर्दी होत होती. याचा परिणाम हा कोरोना विषाणूचे संक्रमण होण्यास हातभार लागल्याने पनवेल शहरात कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला आणि किराणा मालाच्या दुकानांवर निर्बंध वाढले असून काउंटर विक्री आजपासून बंद करण्यात आली आहे.
पनवेलमध्ये आजपासून लॉकडाऊन कडक करण्यात आल्याने केवळ घरपोच डिलिव्हरी करण्याची परवानगी असणार आहे. पनवेलमध्ये लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला आणि किराणा मालाच्या दुकानांवर निर्बंध वाढले. भाजीपाला आणि अन्नधान्याची काउंटर विक्री आजपासून बंद करण्यात आली आहे. लॉकडाऊन असून अनेक नागरिक भाजीपाला आणि अन्नधान्य खरेदीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात बाहेर निघत आहेत. अनेकांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे.
रायगडमध्ये बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. सध्या पनवेल क्षेत्रात ११९४ असून १७०४ रुग्ण बरे झालेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ५७.१४ टक्के आहे. सर्वाधिक रुग्ण हे पनवेल येथे आहेत. त्यानंतर कामोठे, खारघर, नवीन पनवेल, पनवेल या ठिकाणी २०० च्या पुढे रुग्ण आहेत. तर कळंबोलीत येथे १७८ रुग्ण असून तळोजा येथे ६३ रुग्ण आहेत.