दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. औरंगाबादमध्ये छेडछाडीला कंटाळून २१ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केलीय. औरंगाबादच्या सिडको भागातील ही घटना आहे.
स्वप्नील मणियार नावाचा तरुण तरुणीला अनेक दिवसांपासून त्रास देत होता. श्रूती कुलकर्णी या तरुणीनं मागील आठवड्यात तरुणाविरोधात विनयभंगाची तक्रारही केली होती. पोलिसांनी कारवाई करत तरुणाला अटक केली होती. मात्र स्वप्नीलची जामीनावर सुटका झाली.
जामीनावर सुटल्यानंतर तरुणानं पुन्हा एकदा तरुणीला त्रास द्यायला सुरूवात केली. अखेर तरुणीनं कंटाळून झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. पोलिसांनी स्वप्नील मणियारला पुन्हा अटक केलीय.

