पाकिस्तानी अभिनेत्रीची आईसमोर भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानी अभिनेत्रीची आईसमोर भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये दहशतावाद्यांनी एका पश्तो अभिनेत्रींची तिच्याच आईसमोर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

मुसरत शाहीन ही अभिनेत्री आपल्या आईसोबत नौशेरा जिल्ह्यामध्ये खरेदी करण्यासाठी एका जवळच्या बाजारात जात असताना बाईकवरील अज्ञातांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. शाहीनला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

आरोपी घटनास्थळावरुन फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून या हत्येचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या प्रकरणी तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *