फुलेवाडीत चोर समजून तरूणाला चोप

फुलेवाडीत चोर समजून तरूणाला चोप

कोल्हापुरात चोरांच्या दहशतीमुळे लोकांना सळो की पळो करुन सोडलं आहे. अफवेचं लोण हे इतकं पसरलं आहे की, फुलेवाडीत चोर समजून ग्रामस्थांनी  तरुणाला चोप दिला.

या मारहाणीत तरुण गंभीर जखमी असून त्याला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णायात दाखल करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गेल्या आठवडाभरातली ही तिसरी घटना आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेली महिनाभर अनेक गावांमध्ये चोर आल्याच्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे गावागावांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. गावात एखादा नविन व्यक्ती दिसला तर त्याची चौकशी केली जाते.

यापूर्वी काटेभोगाव इथंही गावकऱ्यांनी संशयित मारूती कारवर हल्ला चढवला होता. त्यावेळी मारुती 800 आणि अँबेसेडर गाडीत एक बंदूक आणि 21 जिवंत काडतुसे सापडली होती.

याशिवाय हळदी इथंही ग्रामस्थांनी संशयितरित्या फिरणाऱ्या पाच जणांना पकडून चोप दिला होता. या संशयितांकडे नारळ, लिंबू, कापूर वगैरे साहित्य सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *