राजीव गांधींच्या जयंतीनिमित्ता नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

राजीव गांधींच्या जयंतीनिमित्ता नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी श्रद्धांजली वाहिली.

काँग्रेस अध्यक्ष आणि राजीव गांधींच्या पत्नी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, रॉबर्ट वढेरा यांनी  स्मृतिस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदी नेतेही यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवरुन माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.

इंदिरा गांधींची हत्या ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी झाली. राजीव गांधी राजकारणात येऊन वर्ष-दोन वर्षे होत नाहीत तोच हा एक प्रचंड आघात त्यांच्यावर झाला. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी राजीव गांधींच्या हाती पंतप्रधानपदाची सूत्रे आली. पंतप्रधानपदाची शपथ घेतलेले देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. १९९१ मध्ये राजीव गांधींची हत्या करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *