कुत्र्यांची रवानगी फार्महाऊसवर ,नाराज राज ठाकरेंचं पाऊल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना घरातील पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याने काल त्यांच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळेच नाराज झालेल्या राज ठाकरेंनी आपल्या आवडत्या ‘बाँण्ड’ सोबत इतर दोन ग्रेट डेन कुत्र्यांना कर्जतच्या फार्म हाऊसवर पाठवून दिलं आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, शर्मिला यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच बाँण्ड, जेम्स आणि शॉन या तीन ग्रेट डेन्स कुत्र्यांना कर्जतमधील फार्महाऊसवर पाठविण्यात आलं आहे. पुन्हा असं काही होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पाठविण्यात आलं आहे.

कुत्र्याने चावा घेतल्याने शर्मिला ठाकरे गभींर जखमी झाल्या. चेहऱ्यावरील जखम एवढी गंभीर होती की, त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तब्बल 65 टाके पडले आहेत. तसेच गरज पडल्यास त्यांच्यावर प्लास्टिक सर्जरीही करावी लागू शकते असे हिंदुजामधील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. सुत्रांच्या मते, शर्मिला यांनी चुकून कुत्र्याच्या पायावर पाय पडल्याने कुत्र्याने त्यांना चावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *