अल्पवयीन मुलीची अश्लिल चित्रफित व्हायरल, मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीची अश्लिल चित्रफित व्हायरल, मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

एका अल्पवयीन मुलीची अश्लील चित्रफित बनवून ती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं पीडित मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. उदगीरमध्ये ही धक्कादायक  घटना घडली आहे.

पीडित मुलगी शिक्षणानिमित्त मैत्रिणींसोबत उदगीरमध्ये राहत होती. मात्र, तिची अश्लील चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं तिला जबर धक्का बसला. तीने यानंतर काल दुपारी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

सध्या मुलीवर उपचार सुरु आहेत. मात्र, चित्रफित कुणी काढली आणि व्हायरल केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

घटनेचं गांभीर्य लक्षात घेता स्वत: डीवायएसपी लता फड या उदगीरला दाखल झाल्या आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथकंही तैनात करण्यात आली आहेत. ही चित्रफित पसरू नये यासाठी अनेकांची चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *