22 वर्षीय मुलीवर 16 वर्षांपासून पित्याचा बलात्कार, परळीतील धक्कादायक प्रकार

गेल्या 16 वर्षांपासून स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. बीडमधील परळी भागातून 48 वर्षांच्या आरोपी पित्यासह आईलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

गेल्या 16 वर्षांपासून पित्याचे अनन्वित अत्याचार सहन करणारी तरुणी 22 वर्षांची आहे. अनेक वर्ष सुरु असलेल्या अन्यायाविरोधात तोंड उघडून तिने पोलिसात तक्रार दाखल केली. या सर्व घटनेबाबत आईला माहिती असूनही ती गप्प राहिली, तिने तरुणीला कुठलीही मदत केली नाही. म्हणूनच तिच्या नराधम वडिलांसह आईविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन वर्षांपूर्वी ती गर्भवती झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. मात्र तरीही पित्याकडून वारंवार बलात्कार सुरु होते. तीन महिन्यांपूर्वी तरुणी पुन्हा प्रेग्नंट झाली आणि पित्याने तिला गर्भपात करण्यास बजावले. अखेर तिने पोलिसांत धाव घेतली.

स्थानिक कोर्टात आई-वडिलांना हजर करण्यात आलं असून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *