खासदाराच्या मुलाला कॉलगर्ल आणि तिच्या ड्रायव्हरनं तब्बल दीड लाखांनी लुटलंय

उत्तर प्रदेशच्या एका खासदाराच्या मुलाला कॉलगर्ल आणि तिच्या ड्रायव्हरनं तब्बल दीड लाखांनी लुटलंय. मुंबईतील सांताक्रुज भागात ही घटना घडली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार पुत्रानं काल वाकोला पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यानं आरोप केलाय की १६ ऑगस्टला रात्री ही घटना घडली. एका एजंटच्या माध्यमातून त्यानं कॉलगर्लला बोलावलं होतं. पण कॉलगर्ल आपल्या ड्रायव्हरसोबत ठरलेल्या ठिकाणी आली आणि तिनं चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडून पैसे हडप केले.

घाबरलेल्या खासदार पुत्रानं दीड लाख रोख रक्कम त्यांना देताच ते दोघं फरार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *