दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाटच

दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाटच

२० ऑगस्ट २०१३ रोजी फेरफटका मारण्यास गेलेल्या दाभोलकरांची सकाळी सातच्या सुमारास पुण्याच्या ओकांरेश्वर मंदिराजवळच्या पुलावर दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळया झाडून हत्या केली. महाराष्ट्रातील जनतेला अंधश्रद्धेच्या खाईतून बाहेर काढणा-या दाभोलकर यांचे मारेकरी दोन वर्षानंतरही सापडत नाहीत, ही शरमेची बाब आहे.

अंधश्रध्दा निर्मुलनासाठी सातत्याने झटणा-या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे उलटली मात्र अद्यापही त्यांच्या मारेक-यांचा तपास लागलेला नाही. पोलिसांकडून या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला मात्र त्यानंतरही मारेक-यांचा शोध लागलेला नाही.

दाभोलकरांच्या हत्येनंतर पहिल्या दिवसापासून पोलिसांनी याच्या तपासाला सुरुवात केली. परंतु, वर्षभरानंतरही पोलिसांना तपासात कोणतेच यश मिळाले नाही. तपासाची दिशा निश्चित करण्यात आणि कोणत्याही एका निष्कर्षाप्रती येण्यास पोलिस कमी पडल्याचे पदोपदी जाणवले.

या प्रकरणाचा तपास करण्यात गुन्हे शाखा अपयशी ठरल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची याचिका दाखल केली. या याचिकेवर निर्णय देत उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. मात्र हत्येचा घटनेला दोन वर्षे उलटली मात्र परिस्थिती अद्यापही जैसे थेच आहे. दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाटच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *