शरद पवारआजपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर

निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते शेतकऱ्यांच्या भेटी देखील घेणार आहेत.  सकाळी ८.३० वाजता मुंबईतून गाडीने प्रयाण करणार आहेत. सकाळी ११. ३० वाजता माणगाव, १२.३० वाजता म्हसळा, १ वाजता दिवेआगार, २ वाजता श्रीवर्धन, ४ वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक, सायंकाळी ५ वाजता हरिहरेश्वर आणि नंतर ६ वाजता बागमांडला मार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत. दापोली येथे मुक्काम करणार आहेत.

दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत.

दिनांक १० जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *