या’ वेळेत उघडी राहणार मुंबईतील दुकानं; बीएमसीची सुधारीत नियमावली

तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर राज्य सरकारने काही निर्बंध शिथील केले आहे. याअंतर्गंत ५ जूनपासून सर्व प्रकारची दुकाने उघडण्याची परवानगी दिली होती. आता दुकांनाच्या वेळेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेनं आज दुकानांच्या वेळेबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मिशन बिगिन अंतर्गंत दुकानं सकाळी ९ ते संध्याकाळी ५पर्यंत सुरू राहणार होती. मात्र, आता दुकानांच्या वेळेत बदल करून दुकानं पूर्ण वेळ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी एक सुधारित नियमावली जारी केली आहे. यामध्ये सर्व मार्केट, मार्केट परिसर आणि दुकानं पूर्ण वेळ उघडता येणार असल्याचं नमूद केलं आहे. मात्र, यात मॉल आणि मार्केट कॉम्पलेक्स सुरू करण्यास अजूनही परवानगी देण्यात आली नाहीये. मुंबई महापालिकेनं काही अटींचा उल्लेखही केला आहे.

सम- विषम या तत्वावर दुकानं सुरू ठेवण्याचा नियम पालिकेनं कायम ठेवला आहे. रस्त्याच्या एका बाजूची दुकानं एका दिवशी तर दुसऱ्या बाजुची दुकानं दुसऱ्या दिशी सुरू राहतील. तसंच, दुकानदारांनी सोशल डिस्टनसिंग व वाहतूकीची व्यवस्था करावी अशा सूचना पालिकेनं केल्या आहेत. ओपन एअर जिम, गार्डनमधील उपकरणं, बार यांसाठी परवानगी नसल्याचंही पालिकेनं स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *