मी हस्तमैथुन करत नव्हतो, लघवी करत होतो, असे अमेरिकन महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्याचा आरोप लावलेल्या तरुणाने पोलिसांना ही माहिती दिली आहे.
कुलाबा पोलिसांनी आज या तरूणाला अटक केलीय. गोपाळ वाल्मिकी असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या घरी जावून पोलिसांनी त्याला अटक केली.
गोपाल वाल्मिकी हा शेअर बाजारात काम करत असून त्याचं लग्न झालेलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगितलं की महिलेने मला पाहिले तेव्हा मी लघवी करत होतो. गोपालचे वडील बीएमसीमध्ये काम करीत आहेत.
मुंबईतील कुलाबा परिसरात सोमवारी सकाळी मर्यान्ना एबडो ही अमेरिकन महिला मॉर्निंग वॉकला गेली असतांना या आरोपीनं महिलेसमोर हस्तमैथुन करू लागला. महिलेनं त्याचे फोटो ट्विटरवर टाकून ही पोस्ट रिट्विट करण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आणि आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले.
हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी तो व्यक्ती कुठे राहतो हे सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. आरोपी गोपाळला आज दुपारी १२ नंतर कोर्टात हजर करणार असून त्याला पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
