बँकॉक स्फोटातील संशयिताचे रेखाचित्र प्रसिध्द

बँकॉक स्फोटातील संशयिताचे रेखाचित्र प्रसिध्द

थायलंडची राजधानी बँकॉकच्या मध्यवर्ती भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयिताचे रेखाचित्र थायलंड पोलिसांनी बुधवारी प्रसिध्द केले.

या शक्तीशाली बॉम्बस्फोटात २७ जण ठार झाले तर, ८० जण जखमी झाले होते. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी हे रेखाचित्र प्रसिध्द केले. स्फोटाच्या काहीवेळ आधी पिवळया रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला एक तरुण तिथे आला त्याने एक भरलेली बॅग ठेवली आणि लगेच तिथून निघून गेला.

ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणी परदेशी पर्यटकांचा मोठया प्रमाणावर ओघ असतो. रेखाचित्र जारी झालेला तरुण फक्त संशयित आहे. यामागे अन्य व्यक्ती, संघटनाही असू शकतात.

लष्कराच्या सरकारला विरोध करणारे गटही यामध्ये असू शकतात. संशयित आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी थायलंड पोलिसांनी २८ हजार डॉलर्सचे इनामही जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *