साक्षीच्या भूमिकेत दिसणार कियारा

साक्षीच्या भूमिकेत दिसणार कियारा

गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा एकदिवसीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात धोनीची पत्नी साक्षीची भूमिका कोण करणार याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाल आहे. धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपटात साक्षीची भूमिका अभिनेत्री कियारा अडवाणी करणार आहे.

सुशांत सिंग राजपूत धोनीची भूमिका साकारत आहे तर त्याची कियारा आता साक्षीची भूमिका रंगवणार आहे.

याआधी ही भूमिका परिणीती चोप्रा आणि आलिया भट्ट करण्यार असल्याच्या चर्चा बॉलीवूड वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र नीरज पांडे यांनी या भूमिकेसाठी कियाराची निवड केली आहे.

‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहे. या वर्षी २२ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *