मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साधेपणाचं आणखी एक उदाहरण काल समोर आलं आहे. सोलापूर दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी एका विडी कामगार महिलेच्या घरी जेवण केलं आहे. मुख्यमंत्र्यांसाठी खास मेजवानी करण्यात आली होती.
वांग्याचं भरीत, चपाती, पुरणाच्या पोळ्या, शेंगदाण्याची चटणी, दही, मसाला भात आणि तेलुगूत प्रसिद्ध असलेला चारू-भुव्वा असा मुख्यमंत्र्यांसाठी खास जेवणाचा बेत होता. तर तिकडे कष्टकरी विडी कामगारासाठी काल हक्काची घरं मिळाली आहेत.
कामगार नेते नरसय्या आडम यांनी ही योजना साकार केली. दहा वर्षांच्या अथक प्रयत्नातून कामगार महिलांचं घराच स्वप्न सत्यात उतरलं आहे. पाच हजार एकशे घरांची ही गृहनिर्माण योजना पूर्णत्वास आली आहे. त्यातील १६०० घराचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हस्तांतरण झालं. उर्वरित साडे तीन हजार महिलांना पुढच्या टप्यात घराचं हस्तांतरण केल जाणार आहे.

