ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरींचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनानंतर साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. लहान मुलांसाठी त्यांनी २२ हून अधिक तर मोठ्यांसाठी ७० हून अधिक नाटक त्यांनी लिहिली. नाट्य- साहित्य क्षेत्रात त्यांचे अमुल्य असे योगदान आहे.

चार दिवसांपुर्वी त्यांना गोदरेज रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. पुढील उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले होते.

नाट्य- साहित्य क्षेत्रात त्यांचे अमुल्य असे योगदान आहे. त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिभा मतकरी, कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डॉ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे.

नाटकं, एकांकिका, कथासंग्रह, कादंबरी, लेख संग्रह अशा साहित्याच्या सर्वच क्षेत्रात त्यांचा वावर होता. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिकांचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा’, आणि अशा अनेक नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं. त्याच्या अलबत्या गलबत्या या नाटकाने अनेक नवे विक्रम रचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *