जळगाव जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची नोंद; आकडा २७९ वर

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातही करोनाचा प्रादूर्भाव दिवसागणिक वाढत आहे. काल रात्रीपासून तिथं १३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्याचा आकडा २७९ वर गेला आहे.

जिल्ह्यातील भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील ४८ करोना संशयितांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. त्यातील ३५ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १३ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भडगावचे १२ तर भुसावळ येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

दरम्यान, संपूर्ण राज्यातील करोना बाधितांची संख्या ३३ हजारांच्या पुढं गेली आहे. काल एका दिवसात राज्यात २३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात इतक्या संख्येनं रुग्ण मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर, आतापर्यंत ७,६८८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. सध्या राज्यभरात एकूण २४१६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *