बेस्टच्या संपावर बेस्ट कामगार संयुक्त कृती समिती ठाम आहे. आजपासून बेस्ट कामगारांनी कामावर येऊ नये, १००% लॉकडाऊन पाळावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. तर दुसरीकडे बेस्ट प्रशासनाकडून मात्र बेस्ट बसेस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर धावणारच असा निर्धार केला आहे. त्यामुळे कोरोना संकटात बेस्ट रस्त्यावर धावणार का ? असा प्रश्न अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पडला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे, योग्य सुविधा द्याव्या, मृत कर्मताऱ्यांच्या नातलगांना योग्य आर्थिक मोबदला द्यावा या कृती समितीच्या मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी कृती समितीने बंद ची हाक दिली आहे.
कृती समितीच्या १००% लॉकडाऊनच्या आवाहनानंतर बेस्ट प्रशासनाने कोरोनामुळे मृत झालेल्या चार कर्मचाऱ्यांच्या नातलगांना नोकऱ्या दिल्या आहेत. तसंच, सध्याच्या कठिण परिस्थितीत अत्यावश्यक सेवेत खंड पडू देऊ नये असेही आवाहन केले आहे.
