काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस जवान शहीद झाला आहे.
सोपोरच्या तुजैर शरिफर भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला. या गोळीबारात कॉन्स्टेबल फैयाझ अहमद जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे त्यांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात एक नागरिकही ठार झाला आहे. हल्ला केल्यानंतर हे दहशतवादी तेथून पसार झाले. दरम्यान, घटनास्थळी लष्कराची अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे.
