महिलेशी अश्लील वर्तन करणा-या त्या तरुणाला अटक

महिलेशी अश्लील वर्तन करणा-या त्या तरुणाला अटक

परदेशी महिलेसमोर अश्लील वर्तन करणा-या त्या तरुणाला बुधवारी सकाळी पोलिसांना ताब्यात घेतले. गोपाळ वाल्मिकी असे या तरुणाचे नाव आहे.

सोमवारी कुलाबा परिसरात गोपाळने अश्लिल हावभाव केल्याचे ट्विट मरियाना आब्दो या महिलेने केले होते. तसेच त्या तरुणाचा फोटोही ट्विटरवर पोस्ट करण्यात आला होता. यानंतर सोशल मिडीयावर टीकेचे सूर उमटत होते.

आब्दो यांच्या ट्विटनंतर १५७७ रिट्विट करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांची शोधमोहीम सुरु होती. अखेर मंगळवारी त्या तरुणाला ताब्यात घेण्यात यश आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *