दिनेश कार्तिक आज बोहल्यावर चढणार

दिनेश कार्तिक आज बोहल्यावर चढणार

भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आज बोहल्यावर चढणार आहे. स्क्वॉशपटू दिपीका पल्लीकलशी तो विवाहबंधनात अडकत आहे.

दिनेश हिंदू आहे तर पल्लिकल ख्रिश्नन आहे. त्यामुळे दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे. ख्रिश्नन पद्धतीने आज विवाहसोबळा पार पडत आहे. तर २० ऑगस्ट रोजी हिंदू पद्धतीने विवाह सोहळा पार पडणार आहे. १५ नोव्हेंबर २०१३ मध्ये दिपीका आणि दिनेशचा साखरपुडा झाला होता.

दिनेश कार्तिकचे हे दुसरे लग्न आहे. २००७ मध्ये दिनेशने त्याची बालमैत्रीण निकीता हिच्याशी लग्न केले होते. मात्र २०१२ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *