राम शिंदे यांच्या कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याविरोधात संभाजी ब्रिगेड आता रस्त्यावर उतरली असून या वादाला आता हिंसक वळण लागलं आहे. पुरंदरेंच्या मुद्द्यावरून अहमदनगरमध्ये गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यात त्यांच्या कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुरंदरेंना जाहीर झालेल्या पुरस्काराविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर थेट गृहराज्य मंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला चढवत आणि दगडफेक केली. तसंच पत्रकं फेकून कार्यकर्त्यांनी तिथून पळ काढला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे.

दरम्यान, पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे शिष्टमंडळासह संध्याकाळी साडेपाच वाजता राज्यपालांना भेटणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *