वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन बुधवारी सकाळी नऊ वाजता मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काशीद कोपर येथे फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. संध्याकाळी उशिरापर्यंत हे दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्तीच्या काळात सूर्या धरणाच्या जुन्या पाइपलाइनमधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण शहराला नव्या योजेनेतून पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे दिवसभर शहराला कमी प्रमाणात पाणीपुरवठा झाला. पाइपलाइन दुरुस्त झाल्यावरदेखील शहरातील पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी २४ तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन वसई-विरार महापालिकेने केले.
