करोनाची दहशत किती पसरत चालली आहे, याचे अजब प्रत्यंतर एका जावयाला नवी मुंबईत आले!
रायगड जिल्ह्यातील कळंब या गावचा जावई असलेला एक तरुण पुण्याहून कळंबमधील गरूडपाडा येथे आपल्या पत्नीला न्यायला आला. त्याला खोकला, शिंका येत असल्याने तो करोनाबाधित असल्याची शंका त्याच्या सासरच्यांना आली. तू परत निघून जा, असे त्यांनी त्याला सांगितले. मात्र तो परत जात नसल्याने त्याला घराच्याबाहेरच बांधून ठेवण्यात आले. त्यामुळे सुटकेसाठी या तरुणाने मदतीचा धावा सुरू केला. पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचल्यानंतर त्यांनी धाव घेत या जावयाची सुटका केली.
