महिलेला शिवीगाळ केल्याने चंद्रपूरमध्ये एका पोपटाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्याची चौकशी सुरु आहे.
जनाबाई साखरकर या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. पोपट शिवीगाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रॉपर्टीच्या वादातून मालकाने पोपटाला असं बोलण्यास शिकवल्याचं त्याचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे हा पोपट त्यांचाच सावत्र मुलगा सुरेश साखरकर यांच्या मालकीचा आहे.
जनाबाई आणि सुरेश साखरकर यांच्यात प्रॉपर्टीचा वाद आहे. त्यावरुनच पोपट शिवीगाळ करत असल्याचं जनाबाईंचं म्हणणं आहे.
दरम्यान, हा पोपट शिवीगाळ करत नसल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे. शिवाय पोपटावर कोणतं कलम लावायचं असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यामुळे आता हा पोपट वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

