राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पत्नी शुभ्रा मुखर्जींची यांचं आज सकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. दिल्लीतील ए. आर. आर रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
काही दिवसांपूर्वीच त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, आज सकाळी 10.51 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रणव मुखर्जी दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर असतानाच शुभ्रा मुखर्जी यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे आपला दौरा अर्धवट सोडून ते नवी दिल्लीला परतले होते.

