रात्रभर पाक सेनेकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार

रात्रभर पाक सेनेकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकने काल रात्री एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला. जम्मू-काश्मीरमधील अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला.

याचबरोबर पाकिस्तानी सेनेने पुँछमधील बालाकोट आणि शाहपूर येथील भारतीय चौक्यांना देखील लक्ष्य केलं. या गोळीबारामध्ये अरनियामधील एक तरुण जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरनियामध्ये रात्री 12 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत गोळीबार सुरुच होता. तर आरएसपुरा सेक्टरमध्ये रात्री 10 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत पाककडून गोळीबार सुरु होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *