ठाणे ते बोरिवली दरम्यान वेगानं प्रवास होण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून १० किलोमीटरचा भूमिगत मार्ग काढण्याचा राज्यसरकारचा प्रस्ताव आहे. टिकूजिनीवाडी ते बोरिवलीपर्यंत बोगदा उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते कापूरबावडी पुलाच्या मार्गिकेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या १० कि.मी.च्या या बोगद्यामुळे ठाणेकरांना अवघ्या ७ ते ८ मिनिटांतच बोरिवलीत पोचता येईल. त्याचबरोबर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत बोगदा करण्याचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं.
या बारा किलोमीटरच्या बोगद्यामुळे मुंबई-पुणे प्रवास सुमारे २५ मिनिटांनी कमी होईल. असंही शिंदे म्हणाले.

