संगकारा भारताकडून खेळला असता, तर त्याला अधिक सन्मान मिळाला असता – रवी शास्त्रीं

संगकारा भारताकडून खेळला असता, तर त्याला अधिक सन्मान मिळाला असता – रवी शास्त्रीं

टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री यांनी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. संगकारा भारताकडून खेळला असता, तर अधिक त्याला सन्मान मिळाला असता, या शब्दांत रवी शास्त्रींनी त्याचं कौतुक केलं आहे.

रवी शास्त्रींनी संगकाराची तुलना थेट डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर यांच्याशी केली आहे. ‘संगकारा हा महान क्रीडादूत आहे, त्याने क्रिकेट रसिकांचं मनोरंजनही केलं. त्यामुळे प्रत्येक श्रीलंकन नागरिकाला त्याचा अभिमान आहे. मात्र तो भारताकडून खेळला असता, तर त्याला अधिक मानसन्मान मिळाला असता.’ असेही गौरवोद्गार रवी शास्त्रींनी काढले आहेत.

‘संगकारा भारतातर्फे खेळला असता, तर ओपनिंगला उतरला असता किंवा तिसऱ्या नंबरवर खेळला असता’ असंही शास्त्री म्हणाले.

श्रीलंका-भारत कसोटी सामन्यात संगकारा करिअरमधील 134 वी आणि शेवटची टेस्ट खेळून निवृत्ती घेणार आहे. 15 वर्षांच्या कारकीर्दीत संगकाराने कसोटी क्रिकेटमध्ये 38 शतकं ठोकत 12 हजार 350 धावा केल्या आहेत, तर 404 वन डे सामन्यांमध्ये 25 शतकं करुन 14 हजार 234 धावा ठोकल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *