थायलंडच्या बँकॉकमध्ये संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारात भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. वृत्तसंस्थेने या बॉम्बस्फोटासंदर्भातील माहिती दिली आहे.
बँकॉकच्या हिंदू मंदिराजवळ हा स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे. इरावन असं मंदिराचं नाव असून या मंदिराच्या परिसरात हा भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. या दृश्यांवरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येते आहे. रिमोटच्या सहाय्याने बॉम्बस्फोट घडवल्याची माहिती मिळते आहे,
ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आहे, त्याजवळ एक फाईव्हस्टार हॉटेलही आहे. शिवाय, या ठिकाणी अनेक पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते.

