एका निर्दयी बापानं नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या मुलीची कुऱ्हाडीनं घाव घालून हत्या केली आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील दाताडा गावात हा धक्कादायक प्रकार झाला आहे.
दिगंबर कदम याला वयाच्या 52व्या वर्षी मुलगी झाली. आता उतारवयात मुलीचा सांभाळ कसा करायचा म्हणून कुऱ्हाडीचा घाव घालून मुलीला संपवलं आणि तान्ह्या मुलीचं प्रेत घरातच पुरलं. या प्रकाराची माहिती त्याचा भाऊ सतीश कदम यांना समजली. त्यानंतर त्यांनी पोलिसात जाऊन हा प्रकार सांगितला. त्यानंतर दिगंबर कदमला अटक करण्यात आली.
कोर्टानं त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे 52 वर्षीय दिगंबर कदमला20 वर्षाचा मुलगा आहे. आणि 20 वर्षाच्या अंतरानंतर ह्या दुसऱ्या मुलीचा जन्म झाला होता.

