वाघ बचावासाठी महाराष्ट्राचा ढाण्या वाघ मैदानात,

वाघ बचावासाठी महाराष्ट्राचा ढाण्या वाघ मैदानात,

महाराष्ट्र सरकारने वाघांच्या बचावासाठी दिलेल्या हाकेला महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सचिन तेंडुलकरने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र लिहून सचिनने मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.

महाराष्ट्र सरकारने महानायक अमिताभ बच्चन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाघ बचाव मोहीमेसाठी साकडं घातलं होतं. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सचिन आणि अमिताभ यांना मोहीमेत सहभागी होण्यासाठी विनंती केली. त्यानंतर बिग बी मोहिमेत सहभागी होण्यास होकार दिला, त्यापाठोपाठ सचिननेही सहमती दर्शवली आहे.

“राज्यात वाघांची संख्या वाढत आहे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. देशभरात 2226 वाघ आहेत, त्यातील 190 वाघ महाराष्ट्रात आहेत. 2006 च्या गणनेनुसार राज्यात वाघांची संख्या 103 होती. राज्यात वाघांची वाढती संख्या ही चांगली गोष्ट आहे.’ अशी माहिती मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *