पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक नागरीवस्त्या लक्ष्य

पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक नागरीवस्त्या लक्ष्य

पाकिस्तान जाणीवपूर्वक सुरक्षा चौक्यांबरोबर नियंत्रण रेषेजवळील नागरीवस्त्यांना लक्ष्य करत आहे.

रविवारी रात्री पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानने दोनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सुरक्षा चौक्यांबरोबर नागरी वस्त्यांवर अंदाधुंद गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला.

जास्तीत जास्त हानी पोहोचावी यासाठी पाकिस्तान १२० एमएम आणि ८२ एमएम उखळी तोफांचा मारा केला. पाकिस्तानकडून गोळीबार होण्याचा हा सलग नववा दिवस आहे.

ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानने आतापर्यंत ४० वेळा तर, वर्षभरात २३० वेळा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले आहे.

पूँछ जिल्ह्यातील सौजियान आणि मंडी सेक्टरमध्ये रात्री दहा ते एक वाजेपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरु होता अशी माहिती कर्नल मनिष मेहता यांनी दिली.

अतिरेक्यांना भारतीय हद्दीत घुसखोरीसाठी मदत करण्यासाठी म्हणून पाकिस्तानकडून हा गोळीबार होतो. पूँछ आणि राजौरी जिल्ह्यामध्ये रविवारी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एका महिला ठार झाली तर पाचजण जखमी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *