अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून फरार असेलेले राष्ट्रवादी आमदार रमेश कदम यांना अखेर आज अटक करण्यात आली आहे. पुणे-नगर रस्त्यावरील ग्रँण्ड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमधून त्यांना सीआयडीच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आमदार रमेश कदम यांचा शोध सुरु होता. २० जुलैपासून त्यांचा शोध सुरु होता. मात्र, गेले अनेक दिवस ते पोलिसांना चकवा देत होते. त्यांना अटक करण्यासाठी राज्यातील अनेक ठिकाणी सीआयडीची पथकं धाडण्यात आली होती. मात्र, गेले अनेक दिवस सीआयडींच्या पथकांना ते सापडेनासे झाल्याने सीआयडीवर देखील टीका होत होती.
सीआयडीने रमेश कदम यांना अटक केले असून हे पथक नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. तळागाळातील लोकांचा मुख्य प्रवाहात आणण्यात यावं यासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र, यामध्ये रमेश कदमांनी कोट्यवधीचा घोटाळा केला असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

