बाळासाहेबांचा दहशतवादी म्हणून उल्लेख केल्याने खळबळ

 बाळासाहेबांचा दहशतवादी म्हणून उल्लेख केल्याने खळबळ

तहलका’ हे नियतकालिक अनेक प्रकरणांच्या मुळाशी जाऊन खळबळजनक गौप्यस्फोट करण्यासाठी प्रसिद्ध आहेच, मात्र यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख दहशतवादी म्हणून केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘तहलका’च्या यावेळच्या अंकामध्ये ‘हू इज द बिगेस्ट टेररिस्ट’ या शीर्षकांतर्गत एक लेख छापण्यात आला आहे. ज्यामध्ये याकूब मेमन, दाऊद इब्राहिम, भिंद्रनवाले यांच्यासोबत दहशतवादी म्हणून चक्क बाळासाहेबांचा फोटो छापण्यात आला आहे.

या फोटोमुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘तहलका’चा निषेध करण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रारही दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *