मुंबई: कुत्र्याला मरेपर्यंत मारलं, सुरक्षा रक्षकावर गुन्हा

काठीनं बेदम मारल्यानं जखमी झालेल्या कुत्र्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू येथील एका कॉलेज कॅम्पस परिसरात नुकतीच ही घटना घडली.

मुंबईतील कॉलेज कॅम्पसमधील सुरक्षा रक्षक प्रताप सिंह यानं ‘भोला’ नावाच्या कुत्र्याला काठीनं बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळं कुत्रा जखमी झाला. त्याच्या शरीराच्या काही भागांची हालचालच होत नव्हती. या प्रकाराची माहिती प्राणिमित्रांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी गेले. काठीनं मारल्यानं कुत्र्याला जखमा झाल्या होत्या. यातच कुत्र्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्त्या सविता महाजन यांना या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यांनी सुरक्षा रक्षक प्रताप सिंह याच्याशी संपर्क साधला. त्याच्याबरोबरचा संवाद रेकॉर्ड केला. त्यात कुत्र्याला मारहाण केल्याची कबुली त्यानं दिली आहे. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात या प्रकरणी सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *