निलगिरी बागेजवळील झोपड्या हटविल्या

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी (दि. २७) मोहीम राबवून निलगिरी बाग येथील अनधिकृत झोपड्या हटविल्या. या भागात पाल, पत्र्याच्या झोपड्या, काही पक्क्या भिंतीची घरे यांचे अतिक्रमण वाढले होते. नोटीस देऊनही या झोपड्या न काढल्याने ही धडक कारवाई करीत ४५ अनधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या.

औरंगाबाद रोडवरील निलगिरी बागेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केलेल्या ४५ बांधकामावर मनपाने जेसीबी फिरवला. यात बहुतांश पत्र्याचे बांधकाम करून घरे उभारण्यात आली होती. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने याआधी या अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरिकांना अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या. अतिक्रमण विभागाची तीन पथके, पंचवटी विभागीय अधिकारी, स्लम विभागाचे अधिकारी यांनी पोलिस बंदोबस्तात ही अतिक्रमण मोहीम राबविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *