सैनिकाकडून मध्यरात्री गळा दाबून पत्नीची हत्या

सुट्टीवर आलेल्या एका सैनिकाने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. चैताली असं मयत महिलेचे नाव आहे. म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रप्रस्थनगरी परिसरातील ही घटना आहे.

बुधवारी मध्य रात्रीच्या वेळी ही घटना घडली असून म्हसरुळ पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पत्नीची हत्या करून पती सुनील बावा याने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.

कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची पोलिसांकडून माहिती देण्यात आलीय. दहा दिवसांसाठी श्रीनगर येथे सैनिक म्हणून कार्यरत असलेला सुनील बावा सुट्टीवर आले होते.

दोन वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता त्यांना अडीच महिन्यांची मुलगी देखील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *