‘आशिकी 2’ या सिनेमाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेला बॉलिवूड गायक अरिजीत सिंहला अंडरवर्ल्डकडून धमकी देण्यात आली आहे. रवि पुजारी गँगने धमकी दिल्याचं कळतं. अरिजीतने या प्रकरणी ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
अरिजीतच्या महितीनुसार, “रवि पुजारीने 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. हे शक्य नसेल तर रवि पुजारीच्या माणसांसाठी दोन शो मोफत करण्यास सांगितलं आहे.”
रवि पुजारी थेट माझ्याशी बोलला नाही, परंतु माझ्या मॅनेजरला कॉल करुन धमकी दिल्याचं अरिजीतने म्हटलं आहे.
दरम्यान अरिजीतने तक्रार नोंदवली असली तरी पोलिसांनी अद्याप गुन्ह्याची नोंद केलेली नाही.

